Monday, March 17, 2014

स्नेहालयास मदत


प्रिय मित्रांनो , स्नेहालय परीवारातफे शुभेच्छा . आपण स्नेहालय परिवाराचे निकट सदस्य आहात. त्यामुळे एक महत्वाची विनंती आपणास करीत आहे. स्नेहालय सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आपल्या संस्थेचे बहुतांश प्रकल्प लहान, वैयक्तिक देणगीदारांच्या समर्थनावर काम करत आहेत. परंतु आपली गंगाजळी रिकामी झाल्याने दरमहा खर्चाचे सुमारे १२ लाख रुपये आपल्याला कष्टपूर्वक गोळा करावे लागतात. सध्या एड्स बाधितांचे रुग्णालय, हिमातग्राम, स्नेहधार, रेदिओनगर ९०.४ F.M. , पुणे स्नेहधार प्रकल्प, बालभवन प्रकल्प, अनामप्रेम, स्नेहालय ई- विद्यालय, अशा प्रकल्पांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुनर्वसन संकुलातील २०० बालकांच्या पालन पोषणासाठी कोणतेही निश्चित दाते उपलब्ध नाहीत. स्नेहालायाचे काम मनापासून आणि प्रामाणिकपणे आपण सर्व करतो. त्याची समाज दाद देतो. पण आपल्या अडचणी मांडताना स्नेहालय परिवाराला नेहमीच संकोच वाटत आला. त्यामुळे कामासोबतच अडचणी खूप वाढल्या. त्यात शौचालय , कर्मचारी निवास , वस्तू विक्री केंद्र, पुणे येथील स्नेहाधार प्रकल्प समाविष्ट आहे. मागील ३ महिन्यात पगार देण्यातही बराच उशीर झाला. या वरून संकटाची कल्पना आपणास येईल. तुम्हाला एक विनंती करतो. आपण आपल्या मित्र आणि नातेवाइकांना विनंती करा. स्नेहालय मधील स्त्रिया आणि मुलांचे एक वेळ अन्न आपण आपला जन्मदिन, स्मृतिदिन, शुभेच्चा भोजन अश्या स्वरुपात देण्याचे त्यांना सुचवा. त्यासाठी रुपये 7500/ - त्यांनी स्नेहालय , अहमदनगर या नावे चेक द्वारे अथवा ई - हस्तांतरण करून द्यावेत. आपले काही मित्र कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कॉर्पोरेट्स, मोठ्या कंपन्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत देतात. त्यांना आयकर कायद्याच्या कलम 80 जी अंतर्गत आयकरात सवलत मिळते. त्यांना आपण स्नेहालय च्या मदतीसाठीचा प्रस्ताव द्यावा. गरज असल्यास आम्ही देखील तपशीलवर माहिती आणि प्रस्ताव सदर करू शकतो. अनेक व्यक्ती देखील दान देतात आणि आयकर सवलत मिळवितात. स्नेहालय अशा देणगीदारांना 80 जी प्रमाणपत्रासह पावती देते. आपण केवळ सुचविले तरी अनेकजण आनंदाने मदत करतात. तसेच हा देण्यातील आनंद मिळून दिल्याबदल आपले क्रुतज्ञ राहतात. आम्ही ईमेलद्वारे स्नेहालयची संपूर्ण माहिती देऊ शकतो. तसेच www.snehalaya.org / www.snehankur.org या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहेच. आमच्या स्थानिक टीम सदस्य जा आणि अहमदनगर , पुणे , मुंबई , औरंगाबाद , नवी मुंबई , जळगाव , नाशिक , ठाणे , नागपूर , बीड , चंद्रपूर , परभणी , अमरावती , बेळगाव , सातारा , कोल्हापूर , गोवा , बंगळूर अशा ठिकाणी आपले कार्यकर्ते देणगीदारांना समक्ष भेटू शकतात. अंबादास चव्हाण 9011020171 किंवा रोहित परदेशी 9850128678 यांना अधिक माहितीसाठी आपण संपर्क करावा. ते आवश्यक प्रस्ताव सादर करतील आणि पावती दात्यापर्यंत पोहोचती करण्याची जवाबदारी त्याची आहे.
सोबत ई बँकिंगसाठीची माहिती देत आहे.
Bank Name HDFC Bank Branch name - Market Yard Branch (Ahmednagar) Savings Account Number 01811000053339 Name of Account (Cheques to be made payable to) Snehalaya (Donations in Indian currency only)
MICR - 414002001 RTGS/IFSC Code HDFC 0000181 मदतीच्या विनातीसह धन्यवाद ,
आपला नम्र,
डॉ गिरीश कुलकर्णी ,
girish@snehalaya.org
http://www.maayboli.com/node/47551

1 comment:

  1. आमीर खानने दिलेले ७२ लाख संपले काय ?

    ReplyDelete